Saturday, September 5, 2026

Epaper

spot_img

आमदार पाटील यांनी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांची अंतरवली सराटी येथे भेट घेऊन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली..

आमदार:- पाटील यांनी आज मनोज जारांगेपाटील यांची घेतली भेट मनोज दादांच्या मराठा आरक्षणाच्या न्याय्य मागणीसाठी सुरू असलेल्या आरपाराच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना त्यांची खालावत चाललेली प्रकृती आणि आंदोलनामुळे जाणवणारा शारीरिक त्रास मनाला अस्वस्थ करून गेला..

सरकार आश्वासन देतंय, शब्द देतंय; पण प्रत्यक्ष अंमलबजावणीची वेळ आली की टाळाटाळ करतय. आश्वासनं देऊन वेळ मारून नेण्याचा हा खेळ आणखी किती दिवस चालणार आहे? लाखो मराठा बांधवांच्या भावनांशी आणि विश्वासाशी सरकार का खेळत आहे?

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने वेळकाढूपणा आणि फसव्या आश्वासनांचा खेळ थांबवून दिलेला शब्द पाळावा आणि मनोज दादांचे आंदोलन थांबवण्यासाठी तातडीने ठोस निर्णय घ्यावा, आपल्या न्याय्य हक्कासाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा बांधवांच्या संयमाचा अंत पाहू नये..

#मराठा_आरक्षण #MarathaReservation #manojjarangepatil #आंदोलन #antarvali_sarati

आणखी वाचा

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी