मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत पीक व पाणी परिस्थितीची पाहणी
धाराशिव : राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. प्रताप सरनाईक हे बुधवार, दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री महोदयांसमवेत जिल्ह्यातील पीक व पाणी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी त्यांच्या दौऱ्यात करण्यात येणार आहे.
दौऱ्यानुसार सकाळी मुंबई येथून खाजगी विमानाने लातूरकडे प्रयाण केल्यानंतर सकाळी १० वाजता लातूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर मोटारीने मौजे करजखेडा, ता. जि. धाराशिव येथे येऊन मुख्यमंत्री महोदयांसमवेत पीक व पाणी परिस्थितीची पाहणी करण्यात येणार आहे.
यानंतर दुपारी मौजे मलकापूर, ता. कळंब, जि. धाराशिव येथे भेट देऊन तेथील पीक व पाणी परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. पाहणीनंतर मंत्री सरनाईक हे मोटारीने सोलापूर विमानतळाकडे रवाना होतील. सायंकाळी मुख्यमंत्री महोदयांसमवेत विमानाने मुंबईकडे प्रयाण करून पुढे ठाणे येथे मुक्काम करतील.
जिल्ह्यातील पिकांची सद्यस्थिती, पाणीसाठा आणि शेतकऱ्यांसमोरील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या पाहणी दौऱ्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


