Friday, October 2, 2026

Epaper

spot_img

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लातूर-धाराशिव-सोलापूर दौरा

मुंबई, दि. २३ सप्टेंबर २०२६ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवार, दि. २३ सप्टेंबर रोजी लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री विविध ठिकाणी पीक व पाणी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी व स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

दौऱ्याची सुरुवात मुंबईतील वर्षा निवासस्थानापासून होणार असून, मोटारीने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे प्रयाण केल्यानंतर विमानाने लातूरकडे रवाना होतील.

लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातील जाऊ आणि औसा तालुक्यातील खरोसा येथे पीक-पाणी परिस्थितीची पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री धाराशिव जिल्ह्यात दाखल होऊन करजखेडा तसेच कळंब तालुक्यातील मलकापूर येथे पीक व पाणी परिस्थितीचा आढावा घेतील.

यानंतर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील धानोरे आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा येथे पाहणी करण्यात येणार आहे. दौऱ्याच्या शेवटी मुख्यमंत्री सोलापूर विमानतळावरून विमानाने मुंबईकडे रवाना होतील.

या दौऱ्याच्या माध्यमातून दुष्काळसदृश परिस्थिती, पाणीसाठा आणि पीकस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणी आणि स्थानिक परिस्थितीचा प्रशासनाकडून आढावा घेतला जाणार आहे.

आणखी वाचा

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी