Friday, October 2, 2026

Epaper

spot_img

करजखेडा येथे मुख्यमंत्री फडणवीसांकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी

धाराशिव : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आज धाराशिव जिल्ह्यातील करजखेडा येथे प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची सद्यस्थिती, पिकांचे झालेले नुकसान तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींची माहिती घेण्यात आली.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि परिस्थिती जाणून घेतली. संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, परिस्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन आवश्यक ती मदत आणि दिलासा देण्यासाठी शासनस्तरावर तातडीने कार्यवाही करण्यात येईल, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.

शेतकऱ्यांचे हित, त्यांच्या कष्टाला न्याय आणि संकटाच्या काळात ठोस आधार देणे ही शासनाची प्राथमिकता असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

आणखी वाचा

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी