स्वातंत्र्यदिनाच्या जल्लोषात मदरसा अरबिया अब्दुल्लाह इब्ने अब्बास दुमदुमला!
ध्वजारोहणासह विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर कार्यक्रम; मुफ्ती रिझवान साहेबांचे राष्ट्रप्रेम, एकता व बंधुभावाचे आवाहन
निलंगा, जि. लातूर प्रतिनिधी :
निलंगा येथील मदरसा अरबिया अब्दुल्लाह इब्ने अब्बास येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी मदरशाच्या परिसरात राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर मदरशातील विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी मदरशाचे मुख्याध्यापक मुफ्ती रिझवान साहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या भाषणातून त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी केलेला त्याग आणि बलिदान याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. देशाची एकता, बंधुभाव आणि राष्ट्रप्रेम जपण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सर्व पाहुण्यांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.
या कार्यक्रमास जनाब खलील साहेब (शबनमवाले), शकिल बांदे अली, सलीम पटेल, सलीम तिलगुरे, शाहिद खान, हाफिज जमीेर तसेच मदरशाचे सर्व असातिजा उपस्थित होते.
याशिवाय औसा येथील हाफिज ताहेर कुरेशी, भादा येथील हाफिज आमेर तसेच News 24 Latur चे चीफ एडिटर हाफिज तौफीक कुरेशी यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
धार्मिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीची भावना रुजविण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात पार पडला.


