Saturday, September 5, 2026

Epaper

spot_img

संजय (मामा) निंबाळकर आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश करणार; निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण

धाराशिव : धाराशिवच्या राजकारणात आज आणखी एक महत्त्वाची घडामोड घडणार असून, संजय (मामा) निंबाळकर हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एकीकडे पक्षातील जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोठी फळी असताना, आता तीन प्रमुख विरोधी नेते एकाच छत्रछायेखाली काम करणार असल्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी काळात संघटनात्मक पातळीवर नेमकी कोणाला जबाबदारी मिळणार आणि कोणाचा राजकीय प्रभाव वाढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या नव्या राजकीय समीकरणामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळणार का? जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जाणार का? तसेच नव्याने पक्षात येणाऱ्या नेत्यांना कोणती जबाबदारी दिली जाणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

संजय (मामा) निंबाळकर यांच्या प्रवेशामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची स्थानिक पातळीवरील ताकद वाढणार की अंतर्गत समीकरणांमध्ये नवे संघर्ष निर्माण होणार, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर धाराशिवच्या राजकारणात आता ‘निष्ठावंत विरुद्ध नवागट’ या समीकरणाची चर्चा रंगू लागली आहे.

आणखी वाचा

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी