Saturday, September 5, 2026

Epaper

spot_img

धाराशिवमध्ये पहिले गणपती विक्री केंद्र सुरू; आकर्षक मूर्ती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

धाराशिव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव शहरातील पहिले गणपती विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. शहरातील विविध गणपती मंडळांच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत या विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर गणेशमूर्तींच्या विक्रीला उत्साहात सुरुवात झाली.

या केंद्रावर पेण येथील इको-फ्रेंडली गणपतीच्या मूर्तींसह विविध आकार, आकर्षक रंगसंगती आणि वेगवेगळ्या डिझाईनमधील गणेशमूर्ती उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना यंदा विशेष मागणी राहण्याची शक्यता आहे.

गणेशोत्सव जवळ येत असल्याने गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध प्रकारच्या गणेशमूर्ती पाहण्यासाठी धाराशिव शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. आपल्या घरासाठी तसेच सार्वजनिक गणेश मंडळांसाठी योग्य मूर्ती निवडण्यासाठी नागरिकांकडून मूर्तींची पाहणी केली जात आहे.

या उद्घाटनप्रसंगी मा.नगरसेवक रोहित निंबाळकर साई परिवार अध्यक्ष,अभिराम पाटील भगिरथी परिवार अध्यक्ष, लखन देशमुख, प्रशांत वीर राजमुद्रा फिटनेस जिम , मंगेश निंबाळकर, श्री आर्ट्स प्रोप्रायटर प्रतीक निंबाळकर, तुषार निंबाळकर तसेच विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरात प्रथमच अशा पद्धतीने एकाच ठिकाणी विविध आकार व डिझाईनच्या गणेशमूर्ती उपलब्ध झाल्याने गणेशभक्तांना मोठी सोय झाली आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी इको-फ्रेंडली गणेशमूर्तींचा वापर करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

आणखी वाचा

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी