Wednesday, October 21, 2026

Epaper

spot_img

धाराशिवमध्ये दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिवाळी किटचे वाटप

धाराशिव, प्रतिनिधी :धाराशिव जिल्ह्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कुटुंबांना दिवाळीनिमित्त मदत करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने दिवाळी किट तयार करण्यात आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती पत्रकारांशी संवाद साधताना देण्यात आली.

या किटमध्ये दिवाळीच्या फराळाचे साहित्य, कंदील, पणत्या आणि कालनिर्णय यांसह विविध वस्तूंचा समावेश आहे. धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना या किटचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच मतदारसंघातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांनाही या उपक्रमांतर्गत मदत देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

किटचे वाटप करण्यासाठी शिवसेनेचे शाखाप्रमुख, जिल्हाप्रमुख, नगरसेवक आणि इतर पदाधिकारी कार्यरत राहणार आहेत. मदत पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून नियोजन करण्यात आले आहे.

धाराशिव जिल्ह्यात पावसाअभावी शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीत शेतकरी कुटुंबांनाही दिवाळीचा सण साजरा करता यावा आणि त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळावा, या उद्देशाने किटचे वाटप करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

या वेळी युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, नगरसेवक राकेश शिंदे, नगरसेविका शीतल ढमाले यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

आणखी वाचा

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी