माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ताभाऊ गायकवाड यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश
धाराशिव, प्रतिनिधी : माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ताभाऊ गायकवाड यांनी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आपल्या समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा पक्षप्रवेश झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ या विचारधारेचा उल्लेख करत नव्याने पक्षात दाखल झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले.
या पक्षप्रवेश सोहळ्यात मनोहर सोपान साबळे, दादासाहेब गायकवाड, यशवंत पवार, कल्याण गायकवाड, दिनकर लांडे फौजी, किरण साबळे, जीवन लांडे, विष्णू मुरूमकर, ज्ञानदेव साबळे, नाना पटेकर, आप्पा साबळे, साहेबराव पवार, दत्तू पवार, दत्ता गवळी, दत्ता साळुंखे, रमेश मुरूमकर, हनुमंत लांडे, तात्या लांडे, सुभाष साबळे, भालचंद्र साबळे, शंकर शिंदे, विठ्ठल गायकवाड, धर्मराज साबळे, अभिमान शिंदे, बाळासाहेब ढवळे आणि किशोर गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता अण्णा साळुंखे, नवनाथ आप्पा जगताप, मेघराज दादा पाटील, युवराज भाऊ कोकाटे, बाळासाहेब मांगले, डॉ. चेतन बोराडे, बालाजी गुंजाळ, विशाल बापू ढगे, युवराज तांबे, अजित दादा पवार, दिलीप तेलंग, वैजनाथ म्हमाने, डॉ. विद्याधर बोराडे, आप्पासाहेब हाके, बापूसाहेब भालेराव, प्रेमदास बैरागी आणि चंद्रकांत सरडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांच्या आगामी सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या पक्षप्रवेशामुळे संबंधित कार्यकर्त्यांच्या राजकीय भूमिकेत बदल झाल्याचे स्पष्ट झाले असून, आगामी काळात स्थानिक राजकीय समीकरणांवर त्याचा काय परिणाम होतो, याकडे लक्ष लागले आहे.


