Saturday, October 3, 2026

Epaper

spot_img

महाव्यवस्थापकांकडून मध्य रेल्वेच्या १६ कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरस्कार प्रदान

श्री राजीव श्रीवास्तव, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी मध्य रेल्वेच्या १६ कर्मचाऱ्यांना त्यांच्या सतर्कतेबद्दल, कर्तव्यनिष्ठेबद्दल, प्रसंगावधानाबद्दल आणि रेल्वेच्या सुरक्षित परीचालानासाठी केलेल्या वेळेवर कार्यवाहीबद्दल ‘सुरक्षा पुरस्कार’ देऊन सन्मानित केले.

कर्तव्यावर असताना कर्मचाऱ्यांनी दाखवलेली उत्कृष्ट सतर्कता आणि समर्पण यांच्या कौतुकार्थ हे सुरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यांच्या वेळेवर केलेल्या हस्तक्षेपामुळे संभाव्य अनुचित घटना टळल्या आणि प्रवासी, रेल्वे कर्मचारी व रेल्वे परीचालनाची सुरक्षा सुनिश्चित झाली. प्रत्येक पुरस्कारामध्ये पदक, प्रशस्तिपत्र, उत्कृष्ट सुरक्षा कार्याचा गौरव करणारा लेख आणि रोख बक्षीस यांचा समावेश आहे.

*पुरस्कार विजेत्यांचा तपशील*

*मुंबई विभाग (७ पुरस्कार विजेते)*

(१) श्री. राहुल बागुल, ‘काटेवाला’, पनवेल, मुंबई विभाग: दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी कर्तव्यावर असताना त्यांना मालगाडीच्या एका वॅगनमधून गॅस गळती होत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी त्वरित स्टेशन व्यवस्थापकाला याची माहिती दिली. बीपीसीएल कर्मचाऱ्यांच्या मदतीने कळंबोली यार्डमध्ये गॅस गळती थांबवण्यात आली. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.

(२) श्री. बी. ई. डिसोझा, ‘काटेवाला’, लोणावळा, मुंबई विभाग: दिनांक २९ जुलै २०२६ रोजी कर्तव्यावर असताना, गाडी क्रमांक 11030 मध्ये चढताना एक दिव्यांग प्रवासी खाली पडल्याचे आणि गाडीसोबत अडकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्वरित त्या प्रवाशाच्या दिशेने धाव घेतली आणि त्याची सुटका करून त्याचे प्राण वाचवले.

(३) श्री. संतोष जाधव, ट्रेन मॅनेजर, कल्याण, मुंबई विभाग: दिनांक २८ जुलै २०२६ रोजी लोकल गाडी क्रमांक टीएस-१ वर कार्यरत असताना, किमी ५७/३४ वर एका लोखंडी पेटीला बाजूने धडक बसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित गाडी थांबवली आणि बाधित पेटी गाडीपासून वेगळी केली.

(४) श्री. केतन लहू धुळे, ट्रॅक मेंटेनर, कर्जत, मुंबई विभाग: दिनांक १६ ऑगस्ट २०२६ रोजी किमी ११६/१०० वर मधल्या मार्गावर मोठे दगड पडल्यामुळे मार्गात अडथळा निर्माण झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्वरित मार्गाची सुरक्षा सुनिश्चित केली आणि संबंधित सर्वांना माहिती दिली, ज्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली.

(5) श्री. स्वप्नील दीपक चाहुरपगारे, ट्रॅक मेंटेनर, कर्जत, मुंबई विभाग: दिनांक १३.०८.२०२६ रोजी किमी १०८/१०० वरील बोगदा क्र. १२ जवळ एक मोठा दगड पडल्यामुळे रेल्वे मार्ग अवरोधित झाल्याचे दिसून आले. त्यांनी त्वरित रेल्वे मार्ग सुरक्षित केला आणि संबंधित सर्वांना याची माहिती दिली. त्यांच्या तत्परतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली.

(6) श्रीमती वृषाली वैभव सावंत जाधव, वरिष्ठ तिकीट परीक्षक, डोंबिवली, मुंबई विभाग: दिनांक १६.०७.२०२६ रोजी सकाळी सुमारे ०८:४६ वाजता डोंबिवली स्थानकावर ‘अप’ लोकल गाडी क्रमांक ए/२० मधून उतरताना एक महिला प्रवासी खाली पडल्याचे पाहिले. ती प्रवासी ट्रेनमध्ये चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या प्रवाशांच्या पायाखाली आली होती. श्रीमती जाधव यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली, त्या महिला प्रवाशाला उचलले आणि सुरक्षित ठिकाणी आणले. त्यांनी तिला प्रथमोपचार दिले आणि पुढील उपचारांसाठी रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली. त्यांच्या तत्परतेमुळे त्या प्रवाशाचा जीव वाचण्यास मदत झाली.

 

*भुसावळ विभाग (३ पुरस्कार विजेते)*

(7) श्रीमती अर्चना पाटील, काटेवाला, पाचोरा, भुसावळ विभाग: दिनांक २८.०६.२०२६ रोजी कर्तव्यावर असताना, पाचोरा स्थानकावर गाडी क्रमांक 01924 सोबत हँड सिग्नलची देवाणघेवाण करताना एका डब्याच्या बॅटरी बॉक्समधून धूर येत असल्याचे पाहिले. त्यांनी त्वरित लाल रंगाचा हँड सिग्नल दाखवून ट्रेन थांबवली. तसेच त्यांनी संबंधित सर्वांना याची माहिती दिली. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.

(8) श्री. रिंकू राम बेरवा, काटेवाला, ओढा, भुसावळ विभाग: दिनांक ०२.०८.२०२६ रोजी रात्रीच्या वेळी कर्तव्यावर असताना सुमारे ०२:०९ वाजता अकोला स्थानकावरून गाडी क्रमांक 12322 जात असताना, हँड सिग्नलची देवाणघेवाण करताना एका डब्यातून लोखंडाची एक सैल झालेली वस्तू बाहेर आलेली असल्याचे पाहिले. त्यांनी त्वरित संबंधित सर्वांना याची माहिती दिली. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.

(9) श्री. योगेश इंगळे, लोको पायलट शंटर, बडनेरा, भुसावळ विभाग: दिनांक २४.०८.२०२६ रोजी शंटिंगचे काम करत असताना, किमी ६७१/ए/२१ वर रुळावर पडलेली एक जड लोखंडी प्लेट पाहिली. त्यांनी त्वरित ब्रेक लावून गाडी थांबवली. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.

(10) श्री. रिझवान शेख एहसान, भुसावळ यार्ड येथील तंत्रज्ञ (कॅरेज अँड वॅगन), भुसावळ विभाग: दिनांक १३.०८.२०२६ रोजी, आपली ड्युटी संपल्यानंतर, एका मालगाडीचा ‘सीबीसी फ्रंट फॉलोअर’तुटलेला आणि ‘सीबीसी प्रोजेक्शन’ २०० मिमीपेक्षा जास्त असल्याचे पाहिले. त्यांनी त्वरित संबंधित सर्वांना याची माहिती दिली. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.

 

*नागपूर विभाग (२ पुरस्कार विजेते)*

(11) श्री. मच्छिंद्र पारसराम भगत, डेप्युटी स्टेशन मॅनेजर, नागपूर, नागपूर विभाग: दिनांक १४.०७.२०२६ रोजी रात्री नागपूर स्थानकावर कर्तव्यावर असताना, एका अज्ञात व्यक्तीला मालगाडीच्या कंटेनरवर चढताना पाहिले; ती व्यक्ती धोकादायक असणाऱ्या २५ केव्ही हाय-टेन्शन ओएचई लाईनच्या अत्यंत जवळ पोहोचली होती. त्यांनी त्वरित ओएचई वीज पुरवठा बंद केला आणि आरपीएफ व इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्या व्यक्तीला सुरक्षितपणे खाली उतरवले.

(12) श्री. अखिलेश कुमार चौरसिया, ट्रेन मॅनेजर, नागपूर, नागपूर विभाग: दिनांक १९.०६.२०२६ रोजी गाडी क्रमांक 22353 मळकापूर स्थानकावरून सुटल्यानंतर कर्तव्यावर असताना, तपासणीदरम्यान पॉवर कारच्या इलेक्ट्रिकल पॅनेलधून धूर येत असल्याचे पाहिले. त्यांनी त्वरित लोको पायलटला सूचित करून गाडी थांबवली आणि उपलब्ध अग्निशमन उपकरणांच्या मदतीने आग नियंत्रणात आणली. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.

 

*पुणे विभाग (४ पुरस्कार विजेते)*

(13) श्री. भारत कुमार, स्टेशन मॅनेजर, माळवली, पुणे विभाग: दिनांक २३.०८.२०२६ रोजी मालगाडी जात असताना १५ व्या वॅगनमध्ये ‘ब्रेक बाइंडिंग’ झाल्याचे आणि त्यामुळे चाके लाल होऊन तापल्याचे पाहिले. त्यांनी त्वरित लाल हाताचा सिग्नल दाखवून गाडी थांबवली. त्यांनी संबंधित सर्वांना सूचित केले, ज्यामुळे संभाव्य अपघात टळला.

(14) श्री. विक्रम सक्सेना, स्टेशन मास्टर, खडकी, पुणे विभाग: दिनांक ०४.०८.२०२६ रोजी तेथून जाणाऱ्या मालगाडीच्या एका वॅगनची चाके पूर्णपणे लाल झालेली आणि ब्रेक बाइंडिंगमुळे धूर निघत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी त्वरित लाल हाताचा सिग्नल दाखवून गाडी थांबवली आणि संबंधित सर्वांना सूचित केले. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.

(15) श्री. पंकज पासवान, तंत्रज्ञ (कॅरेज अँड वॅगन), दौंड, पुणे विभाग: दिनांक ०२.०८.२०२६ रोजी मालगाडीच्या ‘रोलिंग-इन’ तपासणीदरम्यान, एका वॅगनमध्ये ‘सीबीसी योक’ तुटल्यामुळे २४० मिमीचे ‘सीबीसी प्रोजेक्शन’ बाहेर आल्याचे पाहिले. त्यांनी त्वरित संबंधित सर्वांना सूचित केले. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.

(16) श्री. जितेंद्र युवराज महाजन, हेड कॉन्स्टेबल/आरपीएफ, पुणे विभाग: दिनांक ०२.०७.२०२६ रोजी सकाळी १०:३८ च्या सुमारास पुणे स्थानकाच्या फलाट क्रमांक ३ वर, गाडी क्रमांक 11014 सुटत असताना, एका महिला प्रवाशाला चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करताना आणि अचानक तिचा तोल गेल्याचे पाहिले. त्यांनी त्वरित हस्तक्षेप करून त्या प्रवाशाला सुरक्षितपणे वाचवले. त्यांच्या तत्पर कृतीमुळे त्या प्रवाशाचा जीव वाचला.

 

महाव्यवस्थापकांनी सर्व पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांनी दाखवलेली उत्कृष्ट सतर्कता, निष्ठा आणि प्रसंगावधान यांची प्रशंसा केली, तसेच रेल्वेची सुरक्षित कामकाज-प्रक्रिया सुनिश्चित करण्यातील त्यांच्या योगदानाचे कौतुक केले.

  1. याप्रसंगी मध्य रेल्वेचे विविध विभागप्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दिनांक: ७ सप्टेंबर २०२६

प्र. प. क्रमांक: २०२६/०९/**

सदर प्रसिद्धीपत्रक डॉ. स्वप्नील निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून जारी केले आहे.

आणखी वाचा

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी