अधिकारी होऊन गावी परतण्याचे स्वप्न आईने उराशी बाळगले होते
परंडा दि १० ( प्रतिनिधी ) लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी परीक्षेतील कथित पेपरफुटी, परीक्षांच्या तारखांतील बदल आणि शेतीच्या नापिकीतुन आर्थिक अडचणींच्या तणावातून पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंडा तालुक्यातील खासापुरी येथील प्रथमेश देशमुख वय (२५ ) या विध्यार्थीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे .
या घटनेने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे मानसिक आणि आर्थिक प्रश्नांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे.
मुलगा अधिकारी होऊन गावी परतावे अशी कुटुंबाचे इच्छा व स्वप्न पूर्ण करावे, अशी अपेक्षा त्याच्या आईने उराशी बाळगली होती. मात्र, एमपीएससी च्या परीक्षेतील अनिश्चितता, कथित पेपरफुटी आणि त्यातून निर्माण झालेला आर्थिक व मानसिक ताण तणाव गतवर्षी महापुराच्या पाण्याने शेतातील उभे पिक वाहून गेले होते . यंदा पावसाअभावी सोयाबीनचे पीक डोळ्या देखत करपून जात असल्याचे पंधरा दिवसांपूर्वी गावाकडे आलेल्या प्रथमेश देशमुख ने शेतात पिकाची पाहणी केली असता त्याला हे वास्तव चित्र दिसून आले .या पार्श्वभूमीवर प्रथमेशने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.
गुरुवार दि १० रोजी, कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी प्रथमेशच्या कुटुंबीयांची सात्वनपर भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी एमपीएससी परीक्षा व्यवस्थेवर आणि सरकारवर जोरदार टीका केली.
ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी मोठी स्वप्ने घेऊन पुण्या सारख्या शहरात येतात. घरापासून दूर राहून भाडे, मेस, पुस्तके आणि अभ्यासाचा खर्च भागवत ते परीक्षेची तयारी करतात. मात्र, परीक्षा पुढे ढकलणे, पेपरफुटी किंवा निकालाला होणारा विलंब यामुळे त्यांच्या मानसिक आणि आर्थिक अडचणी वाढतात, असा आरोप दीपके यांनी केला.
प्रथमेशच्या मृत्यूची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. अशा परिस्थितीमुळे आणखी किती विद्यार्थ्यांना टोकाचे पाऊल उचलावे लागणार ? असा संतप्त सवालही दीपक यांनी उपस्थित केला. तसेच, एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणतेही टोकाचे पाऊल न उचलता आपल्या कुटुंबाचा आणि भवितव्याचा विचार करावा, असे आवाहन दीपके यांनी केले.
प्रथमेशच्या मृत्यूमुळे एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता, पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवरील आर्थिक-मानसिक ताणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख रणजीत पाटील, रविराज साबळे पाटील यांनी हे प्रथमेश देशमुख यांच्या कुटुंबियाची भेट घेऊन सांत्वन केले
पालकमंत्री हे झेंडा मंत्री, संकटात फिरकत नाहीत
खासापूर येथील एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने पेपरफुटी शेतातील नापिकी कर्जाच्या ओझ्यामुळे पुण्यात आत्महत्या केली ही दुर्दैवी घटना राज्य सरकारचे अपयशमुळे घडली आहे . धाराशीचे पालकमंत्री हे झेंडा मंत्री आहेत ते 15 ऑगस्ट 26 जानेवारी 17 सप्टेंबर रोजीच येतात संकट काळात जिल्हा आठवत नसल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेशराजे निंबाळकर यांनी खासापूर येथील प्रथमेश देशमुख कुटुंबियांची सांत्वन भटी दरम्यान केला . प्रथमेश देशमुख यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरीने मदत करणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक रमेश परदेशी तालुका अध्यक्ष सोमनाथ मिस्कीन माजी नगरसेवक अँड नुरुद्दीन चौधरी, अँड अजय खरसाडे, जिल्हा उपाध्यक्ष विलास शाडू, भूम तालुका अध्यक्ष अँड शिराज मोगल, मोईज सय्यद उपस्थित होते .


