धाराशिव शहर परिसरात आज सकाळी 10 वाजून 12 मिनिटांनी अचानक मोठा गूढ आवाज ऐकू आला. या आवाजामुळे अनेक ठिकाणी खिडक्यांची तावदाने व दरवाजे हादरल्याचे नागरिकांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारचे आवाज ऐकू येत असल्याने नागरिकांमध्ये भीती व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
एकीकडे पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाची गडद छाया, तर दुसरीकडे भूगर्भातून येणाऱ्या या गूढ आवाजामुळे नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. या आवाजाचे नेमके कारण काय, याबाबत प्रशासनाकडून अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.


