Saturday, September 5, 2026

Epaper

spot_img

खासदार ओमराजे निंबाळकर यांचा आमदार पुत्र पाटील यांना दणका लोटस सोडून टायगर मिशन सुरू

शिवसेनेत धाराशिव नगरपालिकेच्या नगरसेवकांचा जाहीर पक्षप्रवेश!

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास; शहरातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढणार

धाराशिव : हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत धाराशिव नगरपालिकेतील नगरसेवकांसह काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

धाराशिव नगरपालिकेचे नगरसेवक श्री. प्रदीप मुंडे, श्री. संतोष उर्फ नाना घाडगे, सौ. सोनाली अमित उंबरे, सौ. केसरबाई ज्ञानदेव करवर तसेच श्री. अमित उंबरे आणि श्री. ज्ञानदेव करवर यांचा शिवसेना पक्षात अधिकृत पक्षप्रवेश मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी नव्याने शिवसेनेत दाखल झालेल्या सर्व सहकाऱ्यांचे शिवसेना परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले. जनसेवा, विकास आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी कार्यरत राहण्याचा शिवसेनेचा विचार पुढे नेत धाराशिव शहरातील पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी या नव्या सहकाऱ्यांच्या सहभागामुळे निश्चितच बळ मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दरम्यान, या पक्षप्रवेशामुळे धाराशिव शहराच्या राजकीय वर्तुळात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढण्याची चर्चा सुरू झाली असून आगामी काळात शहरातील राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यावेळी श्री. सूरज साळुंके, श्री. सोमनाथ गुरव, श्री. ऋषिकेश भैय्या मगर आणि श्री. सह्याद्री राजेनिंबाळकर यांची उपस्थिती होती.

शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्व नव्या सहकाऱ्यांचे स्वागत करत त्यांच्या आगामी सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

आणखी वाचा

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी